कन्यारत्नाच्या जन्माचा अनोखा आनंदोत्सव! वृक्षारोपणातून दिला सामाजिक संदेश!
कन्यारत्नाच्या आगमनाचा अनोखा आनंदोत्सव! वृक्षारोपणातून दिला ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा संदेश!
कराड तालुक्यातील सुपने गावात कन्यारत्नाच्या जन्माचा आनंद एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. युवा उद्योजक दिग्विजय ताजमुख कांबळे यांनी मुलीच्या जन्मानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
विशेष म्हणजे, १० ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या घरी कन्यारत्नाचं आगमन झालं. या आनंदाच्या क्षणाचं औचित्य साधत त्यांनी आपल्या गावात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासोबतच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा आणि मुलींच्या जन्माचा सन्मान करण्याचा संदेश दिला.
ज्याप्रमाणे झाड लावून त्याचं संगोपन केलं जातं, त्याचप्रमाणे मुलीलाही प्रेम, शिक्षण आणि समान संधी देऊन तिचं भविष्य घडवलं पाहिजे, अशी भावना या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली.
मुलगी म्हणजे ओझं नव्हे, तर कुटुंबाचं वैभव आहे, हा विचार समाजात रुजवण्याचा कांबळे कुटुंबीयांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या उपक्रमाचं ग्रामस्थांकडून कौतुक हौउन झाड लावा, झाड जगवा; लेक वाचवा, लेक शिकवा!** हाच प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.





