*नरेंद्र मोदींची पुन्हा एकदा शिवाजी महाराजांशी तर अमित शहांशी तानाजी मालूसरेंशी तुलना; #दिल्ली निवडणूक प्रचारासाठी बनवलेला व्हिडीओ व्हायरल*..

Rokhthok Maharashtra 1 0

दिल्ली : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद शांत होतोय तेच आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणारा एक व्हिडिओ दिल्ली निवडणुकीच्या प्रचारानिम्मिताने प्रसारित झाल्याने वाद निर्माण झाला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून तान्हाजी या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित टाकण्यात आली असून यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पोलिटिकल किडा या ट्विटर हँडलवर ही चित्रफित टाकल्यानंतर त्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया टाकण्यात आल्या आहेत. ही चित्रफित तत्काळ मागे घ्यावी अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील, असे यातील शेकडो प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे. केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवले असून नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे दाखविण्यात आले आहे. शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे, असे संवादही यात दाखवले गेले आले आहेत. चित्रफितीच्या शेवची दिल्ली इलेक्शन २०२० असे इंग्रजीतील वाक्य असून भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे तनाजीच्या वेषात व त्याच्यासोबत ‘शहा जी’ अशी अक्षरेही या चित्रफितीत झळकतात.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.