लोणीकाळभोर येथे तरुण गॅरेज मालकाची गळफास घेऊन आत्महत्या ,आत्महत्तेचे कारण मात्र गुलदस्त्यात…!

Rokhthok Maharashtra 17 0

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मातोश्री ऑटो गॅरेजच्या २७ वर्षीय गैरेज चा मालक असणाऱ्या तारणाने स्वतःच्या गॅरेजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

पवन कांबळे (वय वर्ष- २७ ), रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर

महामार्गावरील लोणी काळभोर मालिमळा येथे मातोश्री ऑटो नावाने पवन कांबळे याचे गॅरेज आहे, पवन कांबळे याचा आज सोमवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गॅरेजमध्ये गळफास घेतल्याचे नागरिकांना दिसून आले, नागरिकांनी त्वरित हि माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ताबडतोप घटनास्थळी दाखल झाले, पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने पवन कांबळे याचा मृतदेह खाली उतरविण्यात आला व पोस्टमार्टम साठी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आला, पवन कांबळे याचे मागील एक वर्षापूर्वी लग्ना झाले होते, पवन कांबळे याने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजले नाही ,पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.