“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडे गुरुजीचे वादग्रस्त वक्तव्य – कडक कारवाईच्या मागणीसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुण्यात निदर्शने”

Rokhthok Maharashtra 1 0

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडे गुरुजी यांनी केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली, भिडेंवर कडक कारवाई करावी वाचाल बडबड थांबवावी अन्यथा आंदोलनाची दिशा तीव्र असणार असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला. भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेस जोडे मारून तीव्र संताप व्यक्त केला.

वारंवार समाजातील तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत तरुणांची माथी भडकविणाऱ्या मनोहर भिडे नामक व्यक्तीने पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत.देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा घाणेरडा प्रकार आहे. या देशात गेल्या नऊ वर्षात अनेक व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले असले, तरी देशाच्या राष्ट्रपित्यावर अवमानकारक शब्दांमध्ये वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देशातील सर्वच महापुरुषांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत.भाजप सरकारच्या काळात जर सातत्याने आपल्या महापुरुषांचा अवमान होणार असेल या पुढील काळात नागरिकांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे. असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी महाराष्ट्राच्या गृह विभागाने तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करत, त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात याविरोधात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.

या आंदोलन प्रसंगी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , अंकुश काकडे, रवींद्र मालवदकर, सुषमा सातपुते, किशोर कांबले, मृणाल वाणी, तन्वीर शैख़ , आजिंक्य पालकर, आशीष माने, शेखर धावड़े, गणेश नलावडे, सानिया झुंझारराव, उदय महाले आणि सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.