कोल्हापूरमधील ‘खूनाच्या बदल्यात खून’ प्रकरणातील कुख्यात ‘डॉक्टर डॉन’चे पुणे कनेक्शन; कुख्यात गज्या मारणे टोळीशी ‘गॅटमॅट’, डॉ. प्रकाश बांदिवडेकरला इंदूरहून अटक 

Rokhthok Maharashtra 1 0

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे २ गुन्हे शाखा, पुणे शहर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अन्वये कारवाई करण्यात आलेला कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन मारणे ( टोळीप्रमुख) याचा साथीदार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर यास इंदौर, मध्यप्रदेश येथून
अटक

कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन ऊर्फ गज्या मारणे ( टोळीप्रमुख ) व त्याच्या साथीदारावर दि. १५/१०/२०२२ रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री नारायण शिरगांवकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा हे करीत आहेत दाखल गुन्ह्याचा तपास करताना गजानन ऊर्फ गज्या मारणे याचा साथीदार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर, रा. चंदगड, कोल्हापूर याचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यास्तव डॉ प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याचा शोध घेत असताना त्यास त्याची चाहुल लागल्यामुळे तो कोल्हापुर येथून पसार झाला होता. गोपनीय बामीदारांना सक्रीय करुन डॉ. बांदिवडेकर याचा शोध घेत असताना तो इंदौर, मध्यप्रदेश येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेकडील एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी इंदौर येथे पाठविण्यात आले होते. इंदौर येथे शोध घेत असताना डॉ. बांदिवडेकर मिळून आल्याने त्यास दि. १४/१०/२०२२ रोजी दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.

डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर, रा. चंदगड, कोल्हापूर यांचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये विविध

पोलीस ठाणे अंतर्गत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) चंदगड पो.स्टे. कोल्हापूर
२) गोकुळ शिरगांव एमआडीसी पो.स्टे. कोल्हापूर
३) चंदगड पो.स्टे. कोल्हापुर
४) चंदगड पो.स्टे. कोल्हापूर
५) मार्केट पो.स्टे. बेळगांव शहर, कर्नाटक
६) मार्केट पो.स्टे. बेळगांव शहर, कर्नाटक
७) चंदगड पो.स्टे. कोल्हापूर
८) चंदगड पो.स्टे. कोल्हापूर
९) मार्केट पो.स्टे. बेळगांव शहर, कर्नाटक
१०) चंदगड पो.स्टे. कोल्हापूर ११) चंदगड पो.स्टे. कोल्हापूर
१२) चंदगड पो.स्टे. कोल्हापूर

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस जंगलदार अमीकेश ताकवणे, सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे यांनी केलेली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.