किरकोळ वादाचं भीषण रूप! मारहाणीत मध्ये पडलेल्या काकाचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 37 0

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी गावात किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मस्करीचा राग मनात धरून दोन भावांनी समाधान निकम यांना मारहाण सुरू केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या संदीप शामराव निकम यांच्यावर आरोपींनी बेदम हल्ला केला. त्यांच्या छातीवर दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रूपेश लोकरे आणि प्रवीण लोकरे या दोघा भावांवर कुर्डुवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर दोघेही आरोपी उसाच्या शेतात लपून बसले होते. मात्र पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने अवघ्या दोन तासांत त्यांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.