Uncategorizedपुणे शहर

दशहतवादी हल्ल्यातील शहिद जवानांना कलाकार महासंघाच्या वतीने श्रद्धांजली

‍पुणे / हडपसर (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
“संदेसे आते है,चिठी आती है के तुम घर कब आआेंगे..तुम बिन ये घर सुना है” अशी आठवणीतील आर्त हाक आपल्या मुलासाठी आई तर नवऱ्यासाठी बायको भावासाठी बहिण लढाईवर असणाऱ्या सैनिकांबाबत देताना दिसते आहे. अशीच हाक एक मेणबत्ती शहीद जवानांसाठी या श्रध्दांजली कार्यक्रमात कलाकारांनी देताना दिसली.
नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय शहीद जवानांसाठी हडपसर कलाकार महासंघाने श्रध्दांजली कँडल मार्च चे आयोजन केले होते. हडपसर गाव ते मगरपट्टा चौक या दरम्यान कलाकारांनी हातात आठवणीची एक मेणबत्ती घेऊन पायी रेली काढली. रस्त्यावरील सामान्य नागरिकही रेली दरम्यान सामील होत होते. श्रीकृष्ण भिंगारे, भानुदास लोंढे, विकास वाघमारे, हरदीप टाक, दिलीप मोरे, योगेश गोंधळे, अमर पुणेकर प्रकाश धिंडले, राजवीर पवार, स्वानंद देव, शुभम मोरे, साईनाथ जावळकर, रवीकुमार मगर, महेष पांडे, सागर वेद पाठक, संतोष ढेरे, रोहित भिंगारे, रतन माळी, सायली शिंदे, समृद्धी खटावकर, मोनिका कांबळे, प्रत्यंच्या गुजर, हेमांगी मागारे इत्यादी कलाकार हजर होते. कार्यक्रमाचे आयोजन हडपसर कलाकार महासंघाचे वेदराज जाधव यांनी केले.

Comment here