पुणे

अखेर ! फरारी रवींद्र बऱ्हाटेला पकडण्यात पोलिसांना यश

पुणे: जमीन लाटण्यासह फसवणूक प्रकरणी मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला पकडण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. मागील दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बऱ्हाटेला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने सुटेकचा निःश्वास टाकला आहे. त्याला पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. सोशल मीडियाद्वारे अ‍ॅक्टीव झाल्यानंतर त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.

शहरातील अनेक नागरिकांची फसवून त्यांची जमीन बळकाकविणे, धमकी देउन मालमत्ता स्वतःसह आणि टोळीच्या नावावर करून घेणे, धमक्यांना न जुमानणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचा इशारा देणे, बदनामी करणे यासह मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रविंद्र बऱ्हाटे याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांकडूनक विशेष पथक तयार करण्यात आले होता.

त्यानुसार त्याचा सोशल मीडिया वापरणारे करणारे लोक, लपून फोनवर संपर्क साधणारे लोक, त्याशिवाय त्याने फेसबुकवर पोस्ट केलेले व्हिडिओ वारंवार पाहून लाईक करणाऱ्याची कुंडली तपासण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकांकडून बऱ्हाटेच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यानुसार आज त्याला पकडण्यात यश आले आहे. खंडणी, फसवणूक आणि जमिन बळकाविण्याच्या १२ गुन्हयांमध्ये बऱ्हाटे दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यापैकी तीन गुन्ह्यामध्ये त्याच्याविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

काही दिवसांपुर्वी त्याने फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून पोलिसांवर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी बऱ्हाटेला मदत करणाऱ्याना शोधण्यास सुरूवात केली होती. त्याच्या सोबत सहभागी असल्याचा ठपका ठेउन पोलिसांनी बऱ्हाटेची पत्नी संगीता आणि मुलगा मयूरला अटक केली. चौकशीत फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदर्भात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अ‍ॅड सुनील मोरे यांनीही रवींद्र बऱ्हाटेला मदत केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यानंतर बऱ्हाटेला पकडण्यासाठी पोलिसांकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. तो एका ठिकाणी लपून बसल्याची टीप गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मोठ्या फौजफाट्याने बऱ्हाटेल अटक करण्यात आली आहे.

 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x