पुणे

पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण मोहीम गरजेची – आमदार चेतन तुपे ; राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
शहरीकरण होत असताना बेसुमार वृक्षतोड मुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे, त्यामुळे ऑक्सिजन कमी होत आहे, आगामी काळात ऑक्सिजन वाढीसाठी जास्तीत जास्त वृक्ष लावण्याची मोहीम हाती घ्यावी असे आवाहन राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर मधील मूकबधिर शाळेत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार तुपे बोलत होते.
याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा वासंती काकडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर उपाध्यक्षा शीतल शिंदे, पश्चिम महाराष्ट्र सचिव स्वाती टिळेकर, सरचिटणीस वंदना मोडक, हडपसर विधानसभा उपाध्यक्षा सविता मोरे, अश्विनी जगताप, पुनवडी जत्रा आयोजक रंजना कोंडे, पश्चिम हवेली अध्यक्षा सुपर्णा हरपळे, अश्विनी वाघ, विजया भोसले, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
वृक्षारोपण व महिलांना कर्करोग जागृती मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले होते.