पुणे

श्रीम.ज्योती देवरे तहसीलदार पारनेर यांना होत असलेल्या त्रासाची चौकशी वरिष्ठ महिला सचिवांच्या माध्यमातून करावी… ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती

पुणे : दि.२१ : पारनेर, जि. नगर येथील तहसीलदार श्रीम. ज्योती देवरे यांनी त्यांना होत असलेल्या त्रासातून आत्महत्याबाबतचा विचार मनात येत असल्याचे एक क्लिपमधून पुढे आले होते. यासंदर्भात श्रीम.देवरे यांच्याशी काल दि.२० ऑगस्ट, २०२१ रोजी विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्वतः संपर्क केला. त्यानंतर श्रीम. देवरे यांच्या प्रश्नाबद्दल निवेदन व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांना निवेदन प्राप्त झाले. यानिवेदनाच्या आधाराने ना.डॉ.गोऱ्हे यांनी आज दि.२१ ऑगस्ट, २०२१ मान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन दिले आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ महिला सचिवांतर्फे या घटनेची चौकशी करावी याबद्दल सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे.

त्याचबरोबर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी श्रीम देवरे संदर्भात विभागीय आयुक्त स्तरावरती चौकशी चालू असून महसूल विभागाच्या मार्फत देखील या घटनेबद्दल लक्ष घालण्यात आलेला आहे असे सांगण्यात आले आहे. याखेरीज माननीय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी डॉ.गोऱ्हे यांनी संपर्क करून त्यांच्याशी बोल्या आहेत. यासंदर्भात महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी सुरू असून सात दिवसात अहवाल सादर करणार असल्याचे श्री भोसले यांनी सांगितले तसेच या विषयांमध्ये योग्य तो मार्ग काढण्यात या दृष्टीने डॉ.गोऱ्हे प्रयत्न करणार आहेत.

लोकप्रतिनिधीची कामे होत असताना काही वेळा मतभेद होतात आणि काही वेळेला विशेष हक्कांचा प्रश्न देखील तयार होतो. दुसऱ्या बाजूला प्रशासनातील काही लोकं महिला अधिकाऱ्यांवर किंवा इतरांवर सुद्धा कुरघोडी करण्यासाठी अयोग्य गोष्टींचा वापर करताना दिसतात. या सगळ्याबद्दलची चौकशी झाल्यावर त्यामध्ये वस्तुस्थिती जी आहे ती समोर येईल. या दृष्टीकोनातून या चौकशीमधील तपशिलाची अपेक्षा असेल असे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.