पुणे

दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर, दि. २३ (प्रतिनिधी – स्वप्नील कदम) – पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ५ मोबाइल व २ दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी (दि. २३) पहाटे पाचच्या सुमारास वडकी (ता. हवेली) येथून ताब्यात घेतले आहे.

पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने लोणी काळभोर, हडपसर व सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून

२ मोटरसायकल, ५ मोबाईल फोन असा १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे कबूल केले. हा सर्व मुद्देमाल त्याच्या कडून जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, निकेतन निबाळकर, अमृता काटे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अविनाश जोशी, विनोद कांबळे, महेश भोंगळे, सागर वणवे, हेमंत कामठे, अभिजित टिळेकर, बिभिषण कुंटेवाड, दिपक सोनवणे यांनी केली आहे.