पुणे

भाजप खासदाराच्या सुनेला मारहाण, व्हिडिओ वायरल : रुपाली चाकणकर मदतीला आल्या धावून

पुणे : (Rokhthok Maharashtra Online )

वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओ मध्ये त्यांनी सासरकडचे लोक मारहान करत असल्याचे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या  महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेच्या मदतीला चाकणकर  धावून गेल्या आहेत .

रामदास तडस यांच्या सुन पुजा यांनी सासरकडचे लोक अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. तेथील लोक मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे. यावरुन त्यांचा व्हिडीओ रुपाली चाकणकर यांनी टि्वटरवर पोस्ट केला आहे. रुपाली चाकणकर  म्हणाल्या की, ‘आज मला माझ्या मोबाइलवर एक व्हिडीओ आला. रडण्याचा आवाज येत होता. मी पूजा बोलतेय. मला मदतीची गरज आहे. मला इथून बाहेर काढा. अन्यथा माझ्या जीवाला धोका आहे. अशा स्वरुपाचा तो व्हिडीओ होता’ अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.