पुणे

“खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त “जगदंब प्रतिष्ठान”च्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबीर”

नारायणगाव – खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जगदंब प्रतिष्ठान’ आयोजित १४ वर्षाखालील लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आज त्यांच्या मातोश्री श्रीमती रंजनाताई रामसिंग कोल्हे यांच्या शुभहस्ते पार पडले.
या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी आमदार पोपटराव गावडे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष विवेक तथा बंटीदादा वळसे पाटील, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, अमित बेनके, सागर कोल्हे, बाळासाहेब खिलारी, जि.प.सदस्य पांडुरंग पवार, जि.प.सदस्य भाऊ देवाडे, जि.प.सदस्य मोहित ढमाले, उद्योजक अनंतराव चौघुले, तुळशीराम भोईर, सभापती विशाल तांबे, सुरजभाऊ वाजगे, डी.डी.भोसले, डॉ. सदानंद राऊत, विक्रम भोर, गुलाब नेहरकर, गणपतराव कवडे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, तान्हाजी डेरे, दिलीप कोल्हे, बी.एस.कोल्हे उपस्थित होते.


मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालय, तसेच पुण्यातील डी.वाय.पाटील रुग्णालय, भारती हॉस्पिटल, देसाई आय हॉस्पिटल या नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टर्सच्या उपस्थितीत आज हृदयाचे छिद्र, अस्थिव्यंग, मेंदूतील गाठ, मणक्यातील गॅप, कर्णबधिर, तिरळेपणा, अर्धांगवायू, किडनी आजार असलेल्या १४ वर्षाखालील लहान मुलांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुमारे १९७ मुलांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
या शिबिरात डॉ. देवीश आघारा, डॉ आयुष जैन, डॉ प्रियांका बोस, डॉ ऐश्वर्या, डॉ कीर्ती , डॉ निलम खानल, डॉ सोनम विटकर , डॉ रवींद्र सोनवणे , डॉ फजाज , डॉ प्रसाद नुरे , डॉ संकेत कर्णिक , डॉ आसावरी तावडे , डॉ श्रीरंग करंदीकर , डॉ दिनेश जांगडे , डॉ गौरव खानगे , डॉ आदित्य अय्यर , डॉ दिनेश आघारा , डॉ आयुष जैन , डॉ श्रिया चवरे, डॉ.चैतन्य मोर, डॉ.सुषमा कुलकर्णी, डॉ. अनिकेत मगदूम, डॉ. गौरव खानगे, डॉ.आदित्य आयर आदी डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ सहभागी झाले होते. डॉ.मते हॉस्पिटल, डॉ.स्वप्निल मते, डॉ.अजय मते, डॉ.सदानंद राऊत, डॉ.सागर फुलवडे आदींनी शिबिरासाठी आवश्यक व तांत्रिक सहकार्य केले.
या शिबिरात तपासणी झालेल्या ज्या मुलांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. अशा सर्व रुग्णांना रुग्णालय, जगदंब प्रतिष्ठान तसेच खा.कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालया मार्फत शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
जगदंब प्रतिष्ठान आयोजित या शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून या शिबिराच्या नियोजनासाठी जगदंब प्रतिष्ठानचे अमोल हरपळे, आशिष हांडे, अतुल आहेर, तुषार डोके, तेजस झोडगे, संकेत कोल्हे, सुहास लोंढे, राजाभाऊ कोल्हे, नितीन कोल्हे, राजेंद्र कोल्हे, रामदास अभंग, विजय कोल्हे, मिलिंद कोल्हे, अरुण काकडे, हेमंत कोल्हे, श्रेयस झोडगे आदींनी परिश्रम घेऊन उत्तम नियोजन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मोढवे यांनी केली.