पुणे

आता प्राणपणाने सविधानचे जतन आणि पालन करूया हीच स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांचे आवाहन

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतीय मुक्त झाले त्यातून भारतीय संविधानाचा उगम झाला पण तो इतका साधा नव्हता लाखो आबालवृद्धांच्या रक्ताच्या सिंचनातून आम्हालाही स्वातंत्र्य मिळाला आहे आजादी चा सुवर्णमहोत्सव साजरा करताना आम्हाला या साऱ्यांच्या त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाष चंद्र बोस असे असंख्य स्वातंत्र्यवीर आम्हाला लावले त्यांचे स्मरण करूया.”असे उद्बोधक विचार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी आजादी च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शाहू वाचनालय येथे ग्रंथप्रदर्शनाच्या समारंभात उद्घाटन करताना मांडले
याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई प्राचार्य देसाई ग्रंथपाल गुरव कार्यवाह टीव्ही पाटील आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
डॉक्टर सुभाष देसाई यांनी पुढे सांगितले की गारगोटी येथे येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी सात हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते येणार असून ते हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत 13 डिसेंबर रोजी येथे 7 तरुणांचे बलिदान झालेले आहे त्यादिवशी मान्यवरांची व्याख्याने होतील