पुणे

वाहनाच्या धडकेने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

              होळकर वाडी : अनोळखी कार चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन सायकलवर जात असलेल्या एकास समोरुन जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार मृत्यूमुखी पडला असल्याची घटना होळकरवाडी रोड ( ता. हवेली ) येथे घडली आहे. 

              या अपघातात पांडुरंग अंबादास शंकुर ( वय ५१, रा. होळकरवाडी, ता. हवेली ) हे मृत्यूमुखी पडले आहेत. याप्रकरणी राहुल भरत आतकर ( वय- २५, रा. होळकरवाडी, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अनोळखी कार चालकाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना बुधवार ( १ डिसेंबर ) रोजी रात्री घडली आहे. 

               आतकर हे दिवसभर काम करुन रात्री ८ – ३० वाजण्याच्या सुमारांस घरी येत असताना ते हांडेवाडी स्मशानभुमी जवळ पोहोचले. त्यावेळी  हांडेवाडी कडुन होळकरवाडी कडे जाणाऱ्या अनोळखी कार वरील चालकाने रॉयल पाल्म हॉटेलचे अलीकडे होळकरवाडीकडुन हांडेवाडी कडे येणारे सायकलस्वार पांडुरंग शंकुर यांना समोरुन जोरात धडक दिली. त्यामुळे ते रोडवर बेशुदध अवस्थेत पडले. त्यावेळी आतकर यांनी त्यांना खाजगी रुग्णवाहिकमधुन उपचारासाठी ससुन रूग्णालयात  येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन ते  मयत झाल्याचे सांगीतले.