पुणे

फुरसुंगी मध्ये पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; 5 जणांना केले अटक

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

पूर्वी झालेल्या भांडणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार फुरसुंगीमधील भेकराईनगर येथील ढमाळवाडीमध्ये मंगळवारी साडेआठ वाजता घडला. या प्रकरणी कविता प्रभाकर रुक्के (वय ४०, रा. महाराष्ट्र कॉलनी, ढमाळवाडी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.कृष्णा ऊर्फ चिक्या सुभाष बाळुरगी (वय २०, रा. हांडेवाडी), रुपेश विनोद धोत्रे (वय २०, रा. गोसावी वस्ती), अतुल जाधव (वय २०, रा. माळवाडी, हडपसर), अथर्व शिंदे (वय २०, रा. माळवाडी, हडपसर) आणि राहुल राठोड (वय १९, रा. गोसावी वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अजय रुक्के याचे आरोपींबरोबर यापूर्वी भांडण झाले होते. मंगळवारी अजय त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरुन तेथे आले. भांडणाच्या कारणावरुन त्यांनी अजय याला शिवीगाळ करुन “मारा मारा, याला मारुन जुन्या टाका” असे बोलून कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. लोखंडी कोयते हवेत नाचवत “बघा याला कसा तोडला आम्हालानडला त्याला असेच तोडणार” असे म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.