पुणे

दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा द्या – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची वानवडी पोलिसांकडे मागणी

हडपसर काळेपडळ येथील घराजवळ खेळत असलेल्या एका दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचे दोघांनी अपहरण केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केले.त्याच्या निषेधार्थ व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी.ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली याचे निवेदन हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज वानवडी पोलिस स्टेशन येथे दिले.
सदर प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी.माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे हे आरोपी निर्ढावलेले व सराईत असल्याचे जाणवते.या दुर्दैवी घटनेत या दोन आरोपींनी व्यतिरिक्त इतर कोणी त्यात सामील आहे का याचाही तपास होणे गरजेचे आहे.आरोपींना अटक केल्यानंतर,याबाबत फास्ट ट्रॅक कोर्टात सदर खटला चालवण्यात यावा.माणसाच्या वेशात सैतानी रुपात वावरणाऱ्या या आरोपींना न्यायालयाच्या कडून मृत्युदंडाची शिक्षा होईल.याबाबत आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी.अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
वानवडी पोलिस स्टेशनचे गुन्हे निरीक्षक संदीप शिवले यांनी निवेदन स्वीकारले आहे. या वेळी हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, महिला कार्याध्यक्ष वैष्णवीताई सातव,युवक कार्याध्यक्ष रोहित गुंजाळ,शहर चिटणीस सुशीलाताई गुंजाळ, विधानसभा उपाध्यक्ष पल्लवी होले.उपस्थित होते.
सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.पुणे पोलिस योग्य तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करतील.निंदनीय कृत्य करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा होईल.या मुलीला आवश्यक ते वैद्यकीय उपचार मिळावेत.अशी अपेक्षा हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे यांनी व्यक्त केली.तपास पथके आरोपींच्या मागावर आहेत.लवकरच आरोपी गजाआड होतील असा विश्वास गुन्हे निरीक्षक संदीप शिवले यांनी व्यक्त केला.