पुणे

हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील व्यावसायिकास कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणार्या सात जणांविरोधात लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार कुंजीरवाडी येथील दुकानदार अविनाश दादासो न्हावले यांचे नायगावरोड चौकात दुध डेअरी स्वीट याचे दुकान आहे ते आपल्या दुकानात असताना किरण गावडे व त्यांच्या बरोबर झालेल्या भांडणाचा राग व न्हावले यांचे दाजी विशाल वाईकर यांनी जाब विचारल्याच्या कारणा वरून चिडून राञी साडे आठच्या सुमारास किरण गावडे व त्याचे सहकारी शुभम धुमाळ,वसंत लोंढे,योगेश लोंढे,गणेश म्हाळणकर,यांच्यासह मारहाण केली व दुकानातील सामानाची नासधूस करुन न्हावले यांच्या मानेवर कोयता लावून याठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर दरमहा दोन हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली जर खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आणि हवेत कोयता भिरकवत परिसरात दहशत निर्माण करुन हे सर्व जण तिथून दुचाकी वरुन गाडीच्या रेसचा आवाज करत हातातील कोयता हवेत भिरकावत आरडाओरडा करत निघून गेले.यामुळे कुंजीरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेमुळे दुकानदारात दहशतीचे वातावरण आहे.
पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक अमित गोरे करीत आहे.