पुणे

सराईत वाहनचोरांना वानवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे  ः सराईत वाहनचोरांना वानवडी पोलिसांनी अटक करून नऊ गुन्ह्यांची उकल करीत अकरा मोटारसायकल जप्त केल्या. आरोपींनी पुणे शहर, मुरूड, लातूर परिसरातून वाहनचोरी केल्याची कबुली दिली.
सुरज श्रीकांत कांबळे, गणेश बबन लोंढे (दोघे रा. तरवडेवस्ती, पोलीस चौकीमागे हडपसर, पुणे), अनिकेत उर्फ मॉन्टी शरद माने, भीमाशंकर उर्फ भीमा हरिभाऊ लाळगे (दोघे रा. साठेनगर, तरवडेवस्ती, महमदवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. वानवडी-३, हडपसर, कोंढवा-३, मुरूड (लातूर-१) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक संदीप शिवले (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलीस हवालदार अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर,
अतुल गायकवाड, सरफराज देशमुख, महेश गाढवे, राहुल गोसावी, नीलकंठ राठोड, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णू सुतार यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.