पुणे

लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थानचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

हडपसर ; लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतिने तुकाई दर्शन येथे स्वतंत्र हिंदुस्थानचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहन मा. हवेली पंचायत समिती सदस्य शंकर हरपळे,तर मिठाई वाटप लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमस्थळी तुकाईदर्शन अंगणवाडी विद्यार्थ्यांनी जिजाऊ माता,शिवाजी महाराज,झाशीची राणी लक्ष्मीबाई,सावित्री फुले,पंडित नेहरु,आदि विविध वेगवेगळ्या वेषभुषेत उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप भामे,कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी,सचिव विनोद सातव,कार्यकारिणी सदस्य इंद्रपाल हत्तरसंग,तुकाराम घोडके,राजाराम गायकवाड,चंद्रकांत वाघमारे,अरुण शिंदे,राजु सावळगी,अॕड अनंत कच्छवे,आशा शिंदे,छाया दरगुडे, तुकाईदर्शन अंगणवाडी शिक्षिका वैशाली होले,मदतनिस संगिता देडगे सह परिसरातील विद्यार्थी,स्री-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.