पुणे

यवत परिसरात विबट्याचा वावर स्थानीक लोकांमध्ये भीतीचे वातावरण,वनविभागाचे अधिकारी मात्र सुस्त…!

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

गुरुवार दि. 27 रोजी पुणे, सोलापूर महामार्गा लगद असलेल्या येवत येथील नाईक बागेत सायंकाळी महामार्ग ओलांडून बंदीस्त तार असलेल्या शेतात कंपाऊंड वरून झेप घेऊन, बिबट्याने नाईक बागेत शेतात प्रवेश केल्याचे प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी सांगितले , या प्रकाराबाबत नाईक बागेतील मजूर कामगारांना स्थानिक लोकांनी नाईक बागेतील परिसरात बिबट्या घुसल्याची खबर दिली, नाईक बागेत शेतात राहत असलेल्या मजुर कामगार लोकांनी भीतीपोटी नाईक बागेतुन पलायन केले, मजुर कामगार कुटुंबाने सावधगिरी म्हणून तेथून दुसरीकडे निघून गेल्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र तेथील अनेक शेतकरी कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाचे वनरक्षक सचिन पुरी यांना या संदर्भात खबर देऊन नाईक बागेत घुसलेल्या या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची व पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे, परंतु पुणे वन विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार, याना स्थानिक विभागाने वेळोवेळी पिंजरा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करून सुद्धा वरिष्ठ अधिकारी पाटील यांनीं कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे दौंड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्याणी गोडसे, यवतचे वनपाल सचिन पुरी यांनी सांगितले त्यामुळे वनरक्षक हतबल झाले आहेत.

दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे, ठिक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जनावरांचे बिबट्याने हल्ला करून जीवे मारण्याचे प्रकार घडले आहेत, तसेच काही दिवसांपूर्वी या भागातील लडकत वाडी येथे अज्ञात शिकारीने टॅप लावल्याने बिबट्याचा मृत्यू झाला होता, या संदर्भात अद्याप वनविभागाने तपास लावला नाही, अज्ञात शिकारी मोकाट आहेत याकडे वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, यवत येथील नाईक बागेत लोक वस्तीत बिबट्याची घुसखोरी झाली आहे, त्यामुळे या परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दौंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात तसेंच दौंड तालुक्यातील वनपरीक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्याणी गोडसे, व यवत येथील वनपाल सचिन पुरी यांनी प्रयत्न करून पिंजरा उपलब्ध करून बिबट्याला जेरबंद करावे, तसेच बिबट्यापासून शेतकऱ्यांच्या जनावरांचे रक्षण व्हावे व बिबट्याला पकडून त्याचीही सुरक्षित ठिकाणी रवानगी करावी, अशी मागणी स्थानिक लोकांकडून केली जात आहे.