पुणे

गांजा’ची अवैध्य वाहतूक करणाऱ्या ५ जणांना राजगड पोलीसांनी घेतले ताब्यात…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पूणे खेड शिवापुर टोलनाका (ता. हवेली) येथील पुण्यावरून साताऱ्याकडे भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक (एच आर ५१ बि. सी. २४२४) ही सातारा बाजूकडे जात असताना राजगड पोलिसांचे वाहतूक विभाग नियत्रंणचे पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश व्होवाळ, अमोल सूर्यवंशी, होमगार्ड पंकज शिंदे यांना संशय आल्यामुळे त्यांनी ती कार थांबविली.

कारची तपासणी केली असता मागील डिकीत गांजा आढळून आला त्यामुळे गाडीबरोबर असणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी पडकले असून त्यांची नावे समजू शकली नाही, जिल्ह्यामध्ये सध्या चोरी चोरी चुपके चुपके गांजा व अफू विक्रीचे प्रमाण वाढत असून खेड शिवापुर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी संशयत कार थांबवून साधारणं एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा आठ किलो गांजा पकडला आहे.

कारमधील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पकडलेला गांजा ८ किलो असून पुढील कारवाई सुरू आहे, खेड शिवापूर टोलनाका येथे सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली, गांजा पडकलेली कार व आरोपींना घेऊन खेडशिवापूर चौकीत आणण्यात आले असून पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हे आरोपीची कसून चौकशी करत आहे, गांजा विकणारी टोळी महामार्गावर सक्रिय झाल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे, आजच्या घटनेतील मुख्य सूत्रधार कोण याचा तपास राजगड पोलिस करत आहेत असे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.