पुणे

सूर्याने आपल्याला नव्हे तर आपण सूर्याला झोपेतून जागे करायला हवे” – प्रसिद्ध उद्योजक विजय ठुबे

पुणे – रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची “करियर मार्गदर्शन कार्यशाळा” भारतरत्न भीमसेन जोशी कलामंदिर, औंध येथे नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून मा. विजय ठुबे यांनी मार्गदर्शन केले. 

ते यावेळी म्हणाले की, आपण जेव्हा उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगतो त्यावेळी ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपलीच असते. उद्योगात पदार्पण करताना आपल्या सकाळी लवकर उठायला हवे. दिवसभरातील कामकाजाची यादी सकाळीच तयार करायला हवी आणि झोपण्यापूर्वी त्या यादीतील काम पूर्ण झाले किंवा नाही याचा विचार करायला हवा. उद्योग करीत असताना सकाळी सूर्योदयानंतर आपण उठता कामा नये ही बाब लक्षात घेऊन सूर्याने आपल्याला नव्हे तर आपण सूर्याला जागे करायला हवे. तरच आपल्याला यश संपादन करता येईल. कोणताही व्यवसाय करताना अडी अडचणी येतच असतात. या अडी अडचणी त्यावरील उपायासह समजून घेतल्यास यश संपादन करता येते.” असे विचार त्यांनी यावेळी मांडले. 

या सत्राचे अध्यक्षस्थान  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण आंधळे यांनी भूषविले. डॉ सविता पाटील यांनी मुलाखत घेतली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रमेश रणदिवे, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा. भीमराव पाटील, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव सूर्यकांत सरवदे, माजी विद्यार्थी रविराज काळे, विद्यार्थी प्रतिनिधी निलेश सुतार, शुभांगी शिंदे इ. उपस्थित होते.

प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी करून दिला. सूत्र संचालन प्रा सायली गोसावी यांनी  तर आभार डॉ. रमेश रणदिवे यांनी मानले.सूर्याने आपल्याला नव्हे तर आपण सूर्याला झोपेतून जागे करायला हवे”
– प्रसिद्ध उद्योजक मा. विजय ठुबे
पुणे – रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची “करियर मार्गदर्शन कार्यशाळा” भारतरत्न भीमसेन जोशी कलामंदिर, औंध येथे नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून मा. विजय ठुबे यांनी मार्गदर्शन केले.
ते यावेळी म्हणाले की, आपण जेव्हा उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगतो त्यावेळी ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपलीच असते. उद्योगात पदार्पण करताना आपल्या सकाळी लवकर उठायला हवे. दिवसभरातील कामकाजाची यादी सकाळीच तयार करायला हवी आणि झोपण्यापूर्वी त्या यादीतील काम पूर्ण झाले किंवा नाही याचा विचार करायला हवा. उद्योग करीत असताना सकाळी सूर्योदयानंतर आपण उठता कामा नये ही बाब लक्षात घेऊन सूर्याने आपल्याला नव्हे तर आपण सूर्याला जागे करायला हवे. तरच आपल्याला यश संपादन करता येईल. कोणताही व्यवसाय करताना अडी अडचणी येतच असतात. या अडी अडचणी त्यावरील उपायासह समजून घेतल्यास यश संपादन करता येते.” असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
या सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण आंधळे यांनी भूषविले. डॉ सविता पाटील यांनी मुलाखत घेतली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रमेश रणदिवे, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा. भीमराव पाटील, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव सूर्यकांत सरवदे, माजी विद्यार्थी रविराज काळे, विद्यार्थी प्रतिनिधी निलेश सुतार, शुभांगी शिंदे इ. उपस्थित होते.
प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी करून दिला. सूत्र संचालन प्रा सायली गोसावी यांनी तर आभार डॉ. रमेश रणदिवे यांनी मानले.