Uncategorizedपुणे

“वाईन्स चालविता मला काहीतरी चालू करा, ब्लॅकमेलर कथित पत्रकाराकडून ऑफर… हफ्ता तर नाही, झाली चांगलीच धुलाई… हडपसर मध्ये ब्लॅकमेल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल कधी होणार?

वाईन्सच्या पडलेल्या रिकाम्या बाटल्याचे शूटिंग करून एका साप्ताहिक मध्ये बातमी छापली, तडजोड करण्याकरिता वाईन्सच्या मालकांना मला हफ्ते सुरु करा अशी मागणी केली, वाईन्स चालकांच्या कार्यकर्त्यांनी या कथित दोन पत्रकारांना चांगलाच चोप दिला एक जण पळून गेला मात्र दुसऱ्या साथीदारास चांगला प्रसाद देऊन अद्दल घडविली, या प्रकारची हडपसर मध्ये चांगलीच चर्चा रंगली असून हा तोतया पत्रकार एका पक्षाचे नाव घेऊन पत्रकार असल्याच्या धमक्या देऊन व्यवसायिकांना नाहक त्रास देत आहे, फिर्याद देण्यास कोणी पुढे येत नसल्याने पोलीस कारवाईपासून संरक्षण मिळत असल्याने ब्लॅकमेलिंगचा धंदा तेजीत सुरु आहे, हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

 

हडपसर परिसरात सध्या टोतया पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कार्यालय या कथित पत्रकारांच्या कारनाम्याचा अड्डा आहे, अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांना सामील आहेत त्यामुळे दुकानदारांची तक्रार केली हे पालिकेचे कर्मचारी तक्रारदारास भेटून मिटवून घ्या असा मोलाचा सल्ला देतात त्यामुळे या बोगस पत्रकारांनी उचछाद मांडला आहे, कोणी बांधकाम काढले हे महाशय पोहोचतात आणि फोटो काढून पालिकेला तक्रार देतात आणि मिटविण्यासाठी हजारो रुपये उकळतात असे अनेक प्रकार सध्या घडत आहेत मात्र याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे,

असाच प्रकार नुकताच हडपसर मध्ये घडला एका नामांकित व्यक्तीच्या वाईन्स बाहेरच्या मोकळ्या बाटल्याचे फोटो काढून एक साप्ताहिक मध्ये बातमी छापली, या वाईन्सच्या मालकाने कार्यालयात बोलावले अन समस्या काय आहे विचारले तेव्हा दोन कथित पत्रकार तेथे जाऊन त्यातील म्होरक्या म्हणाला मला काहीतरी सुरु करा (खंडणी मागितली ) कशाबद्दल पैसे द्यायचे आम्ही सरकारला महसूल भरतो अवेध काही करत नाही हे सुनावले खाली जात असताना हा बोगस पत्रकार विनाकारण त्रास देत आहे हे लक्षात आल्यावर कामगारांनी दोघांना चांगला चोप दिला यावेळी म्होरक्या पाळून गेला पण सोबतच्या वयस्कर साथीदारास मात्र चांगलाच प्रसाद मिळाला. या प्रकरणाची हडपसर मध्ये चांगलीच चर्चा रंगली मात्र या खंडणीखोरावर अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने माझे कोणी वाकडे करू शकत नाही या अविर्भावात छोट्या मोठ्या व्यवसायिकांना हा भामटा त्रास देत फिरत असतो त्यासाठी एका पक्षाचे नाव पण वापरतो,

 

आजवर अनेकांकडून खंडणी उकळलेला बहाद्दर….
हडपसर मधील हा कथित सामाजिक कार्यकर्ता अन एका साप्ताहिक चा पत्रकार म्हणून मिरवत असलेल्या भामट्याने ज्यूस सेंटर, मोबाईल शॉपी, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, असे अनेकांना गंडवले आहे, त्यावर 11 गंभीर चोरी दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत, पोलिसांचे बनावट आयडी कार्ड वापरून खंडणी मागितल्याचा गुन्हा काही महिन्यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.