पुणे

लोणी काळभोर पोलीसांच्या सतर्कते मुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट फसला, वाचला एक जिव

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर- लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजीरवाडी येथील काही आरोपींनी हवेत कोयते फिरवून दहशत माजवून एकाचा खून करण्याचं कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला आहे.

   लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २१/०७/२०२३ रोजी ११:०० वा च्या सुमारास लोणी टाऊन मार्शल कर्तव्यावरील पो.कॉ १०३८३ सुतार व पो.कॉ १०३४५ पाटील यांना ११:०० वा च्या सुमारस पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथून कॉल प्राप्त झाला की, कुंजीरवाडी येथे काही इसम कोयते काढुन दहशत करत आहेत. त्यावेळी पो.कॉ पाटील व पो.काँ सुतार यांनी सदरची बातमी  लगेचच तपास पथक प्रभारी पोउपनिरी अमित गोरे व पोलीस उप निरीक्षक श्री हनुमंत तरटे यांना कळवली त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय चव्हाण यांना कळवुन त्यांचे आदेश व मार्गदर्शना प्रमाणे पोलीस उप- निरीक्षक हनुमंत तरटे, अमित गोरे, पो.कॉ पाटील, पो.कॉ सुतार, पोना जगताप असे कारवाई करण्या करीता रवाना झाले. सर्व वरील पोलीस स्टाफ कुंजीरवाडी येथील नायगांवफाटा येथे ११:१५ वा च्या सुमारास पोहचलो असता सदर ठिकाणी काही इसम आरडा ओरडा करत होते, त्यातील दोन इसम त्यांचे हातातील कोयते हवेत फिरवुन आज गणेश चौधरी याला संपवुन टाकतो. असे म्हणुन जोरजोरात ओरडत होते. त्यावेळी सदरचे इसम पोलीसांना पाहुन पळुन जाऊ लागले त्यावेळी पोलीस स्टाफने शिताफिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेवुन त्यांचेकडुन दोन धारदार  लोखंडी कोयते पोलीस उप-निरीक्षक हनुमंत तरटे यांनी जप्त करण्यात आलेले आहेत. त्यावेळी त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नांवे १) तानाजी भाऊसाहेब गावडे,( वय २४ वर्षे, कुंजीरवाडी, माळवाडी, ता. हवेली, जि.पुणे) २) गणेश साहेबराव महाळनर (वय २० वर्षे, धंदा मजुरी, मुळ रा. शेलकुड, ता. अहमदपुर जि.लातुर सध्या रा. माऊली सांवत यांचेकडे भाडोत्री, कुंजीरवाडी. ता. हवेली, जि.पुणे.)३) महेश विजय महारनवर( वय २१ वर्षे धंदा ड्रायव्हर, सध्या रा. पिराचे मंदिराजवळ, म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि.पुणे मुळ रा. तरडगांव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे असल्याची सांगीतले त्यांचे विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ४६९ / २०२३ भादवि कलम १२० (ब), ऑर्म अॅक्ट कलम ४ (२५), मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) सह १३५ लॉ अमेडमेंट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद आरोपीना मा. न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी रिमांड सुनावली असुन पुढील तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक विष्णु देशमुख करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी रितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर,  रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,  विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-५, अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त सो. हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोलीस उप-निरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस उप-निरीक्षक श्री विष्णु देशमुख, पो.ना बनकर, पो.कॉ सुतार, पो.कॉ पाटील पो.कॉ कुदळे, पो.कॉ शिरगीरे, नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या पथकाने केली आहे.