पुणेमहाराष्ट्र

रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशन तर्फे रेव्ह.एस के वाघमारे यांना उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे :”बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे रेव्ह. एस के वाघमारे यांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी अर्पण केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन रेंन्जहिल्स ख्रिशन युथ असोसिएशन यांच्याकडून कदमवाकवस्ती काळभोरचे भूमीपुत्र सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते रेव्ह. एस के वाघमारे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याने गावासाठी तसेच सर्व समाजासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. रेव्ह. एस के वाघमारे यांनी समाजातील शोषित, पीडित आणि दिनदुबळ्या लोकांसाठी अतिशय प्रामाणिकपणे तसेच निःस्वार्थपणे आयुष्यभर आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत काम केले.

त्यामुळे समाजातील तसेच तळागाळातील लोकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. त्यांनी समाजांसाठी,आणि प्रत्येक स्तरातील गरजूवंत लोकांसाठी केलेले निस्वार्थी सामाजिक कार्य पाहता त्यांना रेंन्जहिल्स ख्रिशन युथ असोसिएशन तर्फे मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला. सदरील सन्मान माननीय रेव्ह. हिवाळे व ब्रदर शिंदे यांच्या द्वारे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव रेव्ह. अविनाश वाघमारे, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे चिरंजीव रेव्ह.अविनाश वाघमारे यांनी समाधान व्यक्त करत रेंन्जहिल्स ख्रिशन युथ असोसिएशन चे आभार मानले. वडिलांच्या जाण्याने समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीच भरून निघू शकत नाही. परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचे सामाजिक कार्य असेच अखंड पुढे चालू ठेवून ती निर्माण झालेली पोकळी कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार हिच आमच्या वडिलांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल असे यावेळी त्यांचे सुपुत्र रेव्ह.अविनाश वाघमारे यांनी सांगितले.