पुणेमहाराष्ट्र

लोणी काळभोर येथे संत निरंकारी मंडळाचे रक्तदान शिबिर, रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर -लोणी काळभोर (ता. हवेली) येथील संत निरंकारी सत्संग मिशन शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरा मध्ये २०७ रक्त बाटल्या संकलित करण्यात आल्या.

हा कार्यक्रम दि.१७/१२/२०२३ रोजी घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन व उद्घाटन झोनल इंचार्ज ताराचंद करमचंदानी यांनी केले.तसेच मांजरी विभागाचे मुखी रोहिदास घुले, आव्हाळवाडी सेक्टरचे दत्तात्रय सातव, लोणी काळभोर विभाग मुखी राहुल काळभोर, उरुळी कांचनचे मुखी किशोर लोणारी, तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक रामदास गवारे, व सर्व अनुयायी व पथकाने नियोजन केले.

लोणी काळभोर विभाग मुखी राहुल काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेव सिह यांच निधन झाल्यानंतर त्यांची मुलगी सद्गुरू माता सुधीक्षा सविंदर यांनी संत निरंकारी मिशनची जबाबदारी उत्तम सांभाळली. या मिशनद्वारे स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षरोपण, सत्संग, अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रक्त संकलन करण्यासाठी ससून प्रादेशिक रक्त पेठीचे वैद्यकीय समाजसेवक अधिक्षक डॉ.शरद देसले, व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.