पुणेमहाराष्ट्र

लोककल्याण प्रतिष्ठाणकडून देण्यात “लोककल्याण साधना गौरव ” पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नवरत्नांना लोककल्याण प्रतिष्ठाण तर्क देण्यात येणारा १४ वा ” लोककल्याण साधना गौरव ” पुरस्कार जाहीर झाले असुन १८ जानेवारी रोजी सांयकाळी ८ वा तुकाई दर्शन येथे कैकाडी महाराजांचे तिसरे वंशज किरण महाराज जाधव यांच्या शुभाहस्ते प्रदान करण्यात येणार आहे,तसेच लोककल्याण अन्नपुर्णा योजने अंतर्गत १७ वी लाभार्थी राणी मुदकवी हिस आर्थिकदृष्ट्या सक्षम होईपर्यत दरमहा किराणा वाटपाचा शुभारंभ हि त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती लोककल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी दिली.

 

लोककल्याण राष्ट्र साधना गौरव पुरस्कार पोलिस निरीक्षक-उल्हास कदम,समाज साधना-रमेश निवंगुणे,उद्योग साधना-विशाल कामठे,ज्ञान साधना-तुकाराम ससाणे,धर्म साधना-निखील दरेकर,क्रिडा साधना-जितेंद्र साळुंखे,सहकार साधना-भारत बिडवे,पत्रकारीता साधनादिगंबर माने,मातृ-पितृ गौरव श्री व सौ जया लक्ष्मण कोल्हे आदिंना शाल श्रीफळ मानचिन्ह,मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.