पुणेमहाराष्ट्र

नवीन वर्षातील पहिला उपक्रम – पुणे रेल्वे स्थानकाला दोन व्हीलचेअर भेट

पुणे (प्रतिनिधी)

या नवीन वर्षातील पहिला उपक्रम म्हणून जनविश्व सेवा प्रतिष्ठान पुणेने गरजू प्रवाशांना मदत करण्याच्या उद्देशाने २४ जानेवारी २०२४ रोजी पुणे रेल्वे स्थानकाला दोन व्हीलचेअर भेट दिल्या.
यावेळी श्री.मीना, श्री.शिवप्रसाद आणि पुणे स्टेशनचे इतर वरिष्ठ अधिकारी, जनविश्व सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित छाजेड, सामाजिक कार्यकर्ते विजय सरोदे आणि जनविश्व सेवा प्रतिष्ठानचे सदस्य श्लोक पिंगळे उपस्थित होते.

मीना यांनी स्वयंसेवी संस्थेचे आभार मानले आणि शुभेच्छा दिल्या. प्रवाशांच्या सुविधांबाबत चांगली चर्चा झाली.

जनविश्व सेवा प्रतिष्ठान पुणे ही समाजिक संस्था गरजू व दुर्लक्षित वर्गास मदत व्हावी यासाठी कायम अग्रेसर असते, नव्या वर्षात रेल्वे स्टेशन ला दोन व्हीलचेअर दिल्या आगामी काळात सामाजिक कार्य मोठ्या जोमाने सुरु राहील .
अभिजित छाजेड
अध्यक्ष – जनविश्व सेवा प्रतिष्ठान रेल्वे