पुणेहडपसर

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयामध्ये “विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता” या विषयावर व्याख्यान संपन्न

हडपसर, पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने “विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांच्या हस्ते प्रमुख व्याख्याते व आयोजक यांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते नीरज शेवडे, यांनी व्यसनमुक्त होण्याच्या दृष्टीने मुक्तांगण करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. प्रणित जावकर यांनी मोबाईल व्यसन विषयावर माहिती दिली. सहज सहज आपण कसे व्यसनांमध्ये गुरफटतो व बाहेर पडण्यासाठीच्या उपायांची माहिती दिली. तसेच व्यसनांचे विविध प्रकार, व्यसनाची सुरुवात,व्यसनाचे परिणाम, तसेच व्यसनमुक्त होण्यासाठी उपाय यांची सोदाहरण माहिती सांगितली.

 

कार्यक्रमास प्राचार्य लहू वाघुले सर, गोरक्षनाथ केंदळे, अरविंद शेंडगे, युवराज देशमुख, वहिदा अवटी, श्रद्धा ससाणे, दीपा व्यवहारे, आशा भोसले, दिपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, कल्पना पैठणे, नलिनी गायकवाड आदी शिक्षकवृंद, कैलास वाडकर, विवेक कांबळे, लोखंडे नानी, आदी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन आशा भोसले मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दीपा व्यवहारे मॅडम यांनी केले.