पुणे

साडेसतरानळी आंदोलनाची दखल! पुणे महापालिकेने तातडीने घेतली बैठक ! अमोल तुपे यांच्या लढ्याला यश !

पुणे, १५ जुलै २०२५:
साडेसतरानळी परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधांसाठी छेडलेल्या आंदोलनाची अखेर पुणे महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि क्रांती शेतकरी संघटनेच्या पुढाकारामुळे, पुणे महानगरपालिकेच्या हडपसर-मुंढवा क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त कार्यालयात १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता एक विशेष बैठक बोलावण्यात येणार आहे.

या बैठकीत संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहून तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत. आंदोलनानंतर लगेच मिळालेले हे अधिकृत पत्र प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाचे द्योतक मानले जात आहे.

पत्रानुसार प्रमुख समस्यांचे मुद्दे खालीलप्रमाणे:

1️⃣ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे
2️⃣ खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती
3️⃣ वीजपुरवठा सुरळीत करणे
4️⃣ आरोग्य सुविधा पुरवठा वाढवणे
5️⃣ सार्वजनिक स्वच्छतेवर भर देणे
6️⃣ कचरा व्यवस्थापनाची सुधारणा

क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी नागरिकांना एकत्र आणून लोकशक्तीच्या बळावर प्रशासनाचे लक्ष वेधले. यामुळे प्रशासन हलले असून, येत्या काळात या मागण्यांची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

📢 “जनशक्तीच्या एकजुटीचा विजय” अशा भावना आता नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमोल नाना यशवंत तुपे
संस्थापक – अध्यक्ष
क्रांती शेतकरी संघटना