*कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी! इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई; २३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त*

Rokhthok Maharashtra 1 0

इंदापूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कर्नाटकातून महाराष्ट्रात आणला जात असलेला विमल पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी पकडला. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित मालाची किंमत तब्बल १५ लाख ८७ हजार ६४० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेले सुमारे ८ लाख रुपये किमतीचे वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी वाहनचालक आजमखान मोहम्मद पठाण याच्यासह सोहेल आस्लम शेख आणि कर्नाटकातील कथित पुरवठादाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या तस्करीमागील पुरवठादार आणि उत्पादकापर्यंत तपास पोहोचणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.