दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप!
मुंबईत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. अभिनेत्री आणि राजकीय क्षेत्रातील दिपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा तसेच हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी OTT प्लॅटफॉर्मशी संबंधित व्यक्तींवर कथित दबाव आणला जात असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे.
मात्र, चित्रपटातील कोणतेही पात्र रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित असल्याचे आम्ही कुठेही म्हटलेले नाही, असेही सय्यद यांनी स्पष्ट केले.
कितीही अडचणी आल्या तरी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित होणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
या आरोपांवर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.





