शिरुर

शिरूरच्या पूर्व भागात भयाण दुष्काळ ग्रामस्थ हैराण, सरकार करतंय काय?

शिरूर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)

शिरूर तालुक्यातील पूर्व भागात दुष्काळा ने तीव्र स्वरूप धारण केले आहे. निमोणे, गुनाट,निर्वि,शिरसगाव ,कोळगाव, पिंपळसुटी, इनामगाव,तांदळी या घोडनदीच्या काठावर असणाऱ्या गावांना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून नदी कोरडी पडली आहे.एकवेळ पाणी येऊन गेले ते फार दिवस टिकले नाही. आसपास परिसरात पाणी पातळी घटली आहे. असणाऱ्या विंधन विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. काही विंधन विहिरी दोन दिवसातून फक्त दोन तास पाणी पुरवठा होत आहे. नदीकाठी सर्व पिके जळून खाक झाली आहेत. जनावरे चारा व पाण्यावाचून सैरावैरा भटकत आहेत. सार्वजनिक पाणी पुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. राजकीय आश्वासना चा पाऊस पडून बरेंच दिवस झाले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटले आहे. नदीकाठी असूनही ही गावे पाण्यासाठी नेहमीच तहानलेल्या अवस्थेत आहेत. वाळू उपसा नेहमीच जोरदार सुरु असतो.वाळूमुळे खड्डे पडून पाणी पातळी कमी झाली. त्याचा परिणाम विहिरी व विंधनविहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. वेळीच वाळू माफियांना वाळू उपसा करण्यास विरोध केला असता तर आज ही वेळ आली नसती.परंतु वाळू उपसा हा महसूल विभाग व राजकीय वरदहस्त यामुळे कधीही बंद न होणारा सोन्याची अंडी देणारा व्यवसाय आहे.यात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांची तरुण पिढी गुंतली आहे. आणि आज ही पाणी टंचाई निर्माण झाली आहे ती शेतकऱ्यांना जगणे मुश्कील करीत आहे.फार पूर्वीपासून आपण सावध होऊन उपाय योजना आखली असती व पाणीबचतीयाचा शासनाच्या उपायांचा अवलंब केला असता तर आज ही वेळ आली नसती.जनावरे व पिके जगविण्यासाठी नदीला पाणी येणे गरजेचे आहे. राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी त्वरित उपाय योजना करावी .अशी अपेक्षा या सर्व गावातील लोकांनी व्यक्त केली.

0 0 votes
Article Rating
276 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments