पुणे

हवेत कोयता भिरकावत वाहनांची तोडफोड करणाऱे जेरबंद हडपसर पोलिसांची कामगिरी ः संकेतविहार – फुरसुंगीमध्ये केली वाहनांची तोडफोड

पुणे ः फुरसुंगी, संकेत विहार परिसरात कोयता हवेत भिरकावत वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्यांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. करण निवृत्त तांबे ऊर्फ केटी (वय १९, रा. चंदननगर, पुणे), मायकल अशोक साळवे (वय २१, रा. मांजरी, पुणे), रेहान ख्वाजा शेख (वय १८, रा. वडगावशेरी, चंदननगर, पुणे), सागर भीमराव बोर्डे (वय २०, रा. सातवनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगतले की, संकेतविहार, फुरसुंगी परिसरात ४ जुलै रोजी हवेत कोयता भिरकावत, लोखंडी शस्त्राने वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी वडगावशेरी परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीना ताब्यात घेऊन तपास केला, त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.

पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षिका (गुन्हे) मंगल मोढवे यांच्या सूचनेप्राणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, जोतिबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अमोल दणके, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अमोल जाधव यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.