पुणे

“२ वर्षांपासून फरार मकोका आरोपी अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात!”

खंडणी विरोधी पथक-०२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मकोका गुन्ह्यातील तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे.

दिनांक ३० मार्च २०२६ रोजी, काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी निलेश श्रीकांत गायकवाड हा आपल्या आईला भेटण्यासाठी पिसोळी परिसरात येणार असल्याची खबर मिळाली.

प्रभारी पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि शर्लिन अव्हेन्यू अपार्टमेंट परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

 

 

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, आणि पोलीस उप आयुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पुणे गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.