वसईमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका रिक्षाचालकाने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर क्रूर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना वसई पश्चिम येथील एका सोसायटीमध्ये रात्रीच्या सुमारास घडली. संदीप पवार नावाच्या रिक्षाचालकाने खेळत असलेल्या लहान मुलाला उचललं आणि त्याच्या पायाला पकडून जोरात जमिनीवर आपटलं. त्यानंतरही त्याने मुलाला ओढत नेत मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DWlcaigAPkT/
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, व्हिडिओ पाहून लोक हादरले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुलाच्या वडिलांशी असलेल्या वैमनस्यातून हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
जखमी मुलाचं नाव विघ्नेश कोंडारे असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या मिरारोड येथील रुग्णालयात त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत आणि तो व्हेंटिलेटरवर आहे.
या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
