दरवर्षी १ एप्रिलला ‘एप्रिल फूल डे’ साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांशी हलकी-फुलकी मस्करी करून हसण्याचा आनंद घेतात.
या दिवसाची सुरुवात १६व्या शतकात फ्रान्समध्ये झाली, असे मानले जाते. १५८२ साली फ्रान्समध्ये जूलियन कॅलेंडरऐवजी ग्रेगोरियन कॅलेंडर लागू करण्यात आला. त्यानुसार नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे होऊ लागले.
मात्र काही लोकांना हा बदल माहित नव्हता किंवा त्यांनी जुनीच पद्धत सुरू ठेवली आणि १ एप्रिललाच नवीन वर्ष साजरे केले. त्यामुळे अशा लोकांची थट्टा करण्यात आली आणि त्यांना ‘एप्रिल फूल’ म्हणण्याची प्रथा सुरू झाली.
आजच्या काळात हा दिवस फक्त मजा, हसणं आणि हलक्या-फुलक्या प्रँक्ससाठी ओळखला जातो. मित्र-परिवारासोबत आनंदाने वेळ घालवण्याचा हा एक खास दिवस मानला जातो.
