पुणे

बर्थ डे पार्टीला बोलवलं, आणि बलात्कार केला नराधमाला ठोकल्या बेड्या…

प्रतिनीधी : स्वप्नील कदम

पुणे: तळजाई परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीसांनी मुलीच्या मित्राला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शुभम सीताराम शिंदे (१९ वर्ष, रा धनकवडी) आसे अटक आरोपीचे नाव आहे. सहकारनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,५ डिसेंबर रोजी रात्री पीडित तरुणीला आरोपींनी वाढदिवसाच्या पार्टीला बोलवले होते. तळजाई शेवटचा बस स्टँड वर ये असे त्यांनी पीडितेला सांगितले होते. त्या नुसार तरुणी तिथे पोहचली त्या वेळी आरोपी शुभम याच्या सोबत त्याचा एक मित्र देखील तिथे होता. आरोपी आणि त्याचा मित्र हे दारू पीत बसले होते. त्या वेळी पीडित तरुणी बाजूच्या मोकळ्या जागेत जाऊन बसली.या भागात थंडी अधिक असल्यामुळे तरुणी तिथेच झोपी गेली. त्यानंतर आरोपी शुभम तीला जवळच असलेल्या जंगलात घेउन गेला आणि तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीने तत्काळ सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी आरोपींना अटक केली. सहकारनगर पोलीस तपास करत आहे.