पुणे

सिंहगड रोड पोलीस ठाणेकडील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपी यूनिट ३ कडून १० तासाच्या आत निष्पन्न व गजाआड

सिंहगड रोड पोलीस ठाणेकडील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपी यूनिट ३ कडून १० तासाच्या आत निष्पन्न व गजाआड

दिनांक ३०/०९/२०२२ रोजी दुपारी ३.०० वा. ते रात्री ९.०० वा. दरम्यान एका इसमाला विश्व अपार्ट. न-हे, पुणे येथे कार मधून आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खुन केले असलेबाबत इसम नामे सुदाम राधाकिसन नलावडे वय ५७ वर्षे रा. समर्पण वध्दाश्रम, लोणी काळभोर, पुणे यांनी फिर्याद दिल्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं ४२८ / २०२२ भादंवि कलम ३०२, १४३, १४४ १४५ १४८, १४९ प्रमाणे अनोळखी ५ ते ७ इसमांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ४२८/२०२२ भादंवि कलम ३०२. १४३, १४४ १४५, १४८, १४९ या दाखल गुन्हयाचा समांतर तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती अनिता मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर यांचेकडून तपास करीत असताना पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील व पोलीस अंमलदार ८७६१, ज्ञानेश्वर चित्ते यांनी प्राप्त केलेल्या माहितीच्या अनुषंगाने मयत इसम सुनिल नलावडे याच्या ओळखीची महिला नामे सौ वनिता समीप कुर्डेकर वय ४२ वर्षे धंदा शिक्षीका रा. विश्व अपार्ट, दुसरा मजला, अभिनव कॉलेज रोड, नन्हे, पुणे हीस व तिचा पती समीप कुर्डेकर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास करता मयत सुनिल नलावडे याने मंत्रालय, मेट्रो विभाग येथे नोकरीस लावतो असे अमिष दाखवून व अनेक महिलांना लोन मंजूर करून देतो असे अमिष दाखवून फसवणुक केली होती. सुनिल नलावडे याने फसवणुक केलेले लोक हया त्याचा गेल्या दिड वर्षापासून शोध घेत होते.
दि. ३०/०९/२०२२ रोजी दुपारी ३.०० वा. सुमारास सुनिल नलावडे हा महिला नामे वनिता समीप कुर्डेकर यांच्या घरी आलेबाबतची माहिती फसवणुक झालेला इसम महेश धुमाळ यास प्राप्त झाल्याने त्याने त्याचे ओळखीचे असलेला शिवराज सिंह यास व इतर फसवणुक झालेल्या व्यक्तिना माहिती देवून सदर महिलेच्या घरी येणेबाबत कळविल्याने विश्व अपार्ट, न-हे, पुणे येथे पाठवून सदर महिलेच्या घरात आरोपी नामे १) महेश शंकरराव घुमाळ, वय-३२ वर्षे, रा. मु. पो. पिंपळे खालसा, हिवरे कुमार, पदमावती वस्ती. ता. शिरुर, जि-पुणे २) शिवराज किशोरप्रसाद सिंह, वय-३२ वर्षे, रा. मोहितेवाडी, पोस्टा-वडगाव, ता-मावळ, जि.पुणे ३) शिवाजी रंगाप्पा तुमाले वय-५६ वर्षे, रा. फ्लॅट नं. २०४, दत्तदिप सोसा, नवप्रभा पत संस्थे मागे, गंगानगर म.पो-फुरसुंगी, ता-हवली. जि-पुणे ४) अक्षय पोपट आढाव, वय २२ वर्षे, रा. सिरापुर, ता-पारनेर, जि-अहमदनगर तसेच वरिल ४ आरोपी व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी घरात घुसून फसवणुक केलेला इसम सुनिल नलावडे यास हात पाय बांधुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून व ओढत बिल्डिंगचे खाली पार्किंगमध्ये आणून पुन्हा त्यास बेदम मारहाण करून तो बेशुध्द पडल्याचे पाहून वरिल सर्व लोक पळून गेले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने युनिट ३. कडील ३ वेगवेगळी पथके तयार करून तळेगाव दाभाडे, फुरसुंगी, सिरापुर, ता-पारनेर, जि.अहमदनगर येथे पाठवून वर नमुद निष्पन्न ०४ आरोपीना ताब्यात घेवून त्यांचेकडील मोबाईल व गुन्हयात वापर केलेली स्कोडा कार असा एकुण ५,०९,०००/- चा माल हस्तगत करण्यात आला. वर आरोपी यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची वैदयकिय तपासणी करून मुददेमालासह सिंहगड पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले असून दाखल गुन्हयाचा पुढिल तपास सिंहगड पोलीस ठाणे, पुणे शहर करीत आहेत. वरील प्रमाणे दाखल गुन्हयाचा गुन्हे शाखा युनिट ३ कडून संलग्न तपास करून अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या आरोपींना दाखल गुन्हयात निष्पन्न करून व त्यांचा शोध घेवून त्यांचेकडे तपास करून १० तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त  अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर  रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर  श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१,  गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कळवे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर यांनी केली आहे.