सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता ६०% झाला; ७ महिन्यांची थकबाकीही मिळणार!

Rokhthok Maharashtra 36 0

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! महागाई भत्ता ६० टक्के
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरचा महागाई भत्ता आता ५८ टक्क्यांवरून थेट ६० टक्के करण्यात आला आहे.
याबाबत वित्त विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
म्हणजेच कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीतील वाढीव महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार आहे.
ही थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार असल्याचं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे.
केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात साधारणपणे वर्षातून दोन वेळा बदल केला जातो. मात्र, यावेळी राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासाठी तब्बल सात महिने प्रतीक्षा करावी लागली.
त्यामुळे राज्यातील सरकारी आणि पात्र कर्मचाऱ्यांसाठी ही निश्चितच मोठी आर्थिक दिलासादायक बातमी आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.