पुणे पालिकेत महायुतीत ठिणगी! ‘युती फक्त राज्यात’ म्हणत गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारा

Rokhthok Maharashtra 8 0

पुणे महापालिकेत महायुतीत ठिणगी!
पुणे महापालिकेच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी स्थायी समितीने मंजूर केलेला निधीचा ठराव सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आला.
यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादीचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांनी भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.
त्यावर सभागृह नेते गणेश बीडकर यांनी थेट भूमिका मांडत, “आपली युती आता फक्त राज्यात,” असा इशारा दिला.
महापालिकेत भाजप आपली भूमिका स्वतंत्रपणे घेईल, असा स्पष्ट संदेशच बीडकरांनी दिल्याने महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत.
विशेष म्हणजे या वादात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तटस्थ भूमिका घेतल्याने अजित पवार गटाची राष्ट्रवादी सभागृहात एकाकी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
आता राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवकांच्या विकास निधीलाही भाजपकडून विरोध होणार का? याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
राज्यात महायुतीची सत्ता, पण पुणे महापालिकेत मात्र निधीवरून संघर्ष… त्यामुळे आगामी काळात भाजप-राष्ट्रवादीचा हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.