दुचाकी गाड्या चोरून विक्री करून ऐश करणाऱ्या तरुणाच्या आवळाल्या मुस्क्या , भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे शहरातील वेगवेगळ्या परिसरातून चोरलेल्या दुचाकींची गाड्यांची विक्री करुन मौजमजा करणाऱ्या एका तरुणास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक असता, त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, चोरट्याने भारती विद्यापीठ, हडपसर, त्याने शिक्रापूर परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघड झाले आहे शेखर चंद्रकांत चव्हाण (वय ३४, रा. हरणी, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

आंबेगाव परिसरातील लिपाणे वस्ती भागात एक जण थांबला असून त्याच्याकडे असलेली बुलेट चोरीची असल्याची माहिती पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना खबर्यामार्फत मिळाली, पोलिसांनी लगेच वरिष्ठांना घटनेची माहिती देऊन सापळा लावून चव्हाणला ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे असलेली बुलेट चोरीची असल्याचे निष्पन्न झाले, चौकशीत चव्हाणने पुणे शहर तसेच परिसरातून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

चव्हाण याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, चव्हाण याच्या विरोधात यापूर्वी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, रवींद्र चिप्पा, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, नितेश खैरमोडे, राहुल तांबे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमले, विक्रम सावंत आदींनी ही कारवाई केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.