पतीच्या प्रेमप्रकरणाला व त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या, लोहगाव भागातील घटना, विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल,पतीस अटक…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

दुसऱ्या महिलेसोबत पतीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे समजल्यामुळे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव भागात घडली आहे, याप्ररणी पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणास्तव मयत महिलेच्या पतीस विमानतळ पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यामुळे अटक केली आहे.

सारिका विकास शेळके (वय वर्ष २६ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे, मयताचा पती विकास दामू शेळके (वय वर्ष ३०, रा. पठारे वस्ती, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे,मयत सारिकाचे वडील शामराव पाटील (वय वर्ष ५५, रा. कोल्हापूर ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

मयत सारिका आणि विकास यांचे साधारण सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते, लग्नानंतर काही महिन्यांतच विकासचे एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती सारिकाला मिळाली होती, त्यानंतर तिने याबाबतची माहिती वडिलांनी दिली होती याबाबत इतर नातेवाईकांनी विकासला समजावून सांगितले होते, त्यानंतर विकासने थोडे दिवस असे करणे सोडले होते पण थोड्या दिवसानी पुन्हा विकासचे प्रेमप्रकरण सुरू झाल्याचे सारिकाला समजले तीने वडिलांना पुन्हा सांगितल्यामुळे विकासने तिला शिवीगाळ, मारहाण सुरु केली.

विकासने दिलेला त्रास सहन न झाल्यामुळे सारिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली, पतीचे प्रेमप्रकरण आणि छळामुळे मुलगी सारिकाने आत्महत्या केल्याचे मुलीचे वडील शामराव पाटील यांनी फिर्यादीत नमूद केले आहे, पुढील तपास विमानतळ पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक एन. एस. लहाने करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.