उस्मानाबाद

दुष्काळी उपाय योजना राबवण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी : राणा जगजितसिंह यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी

उस्मानाबाद (वैभव शितोळे पाटील)-

राज्यात एकीकडे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला,तर दुसरीकडे दुष्काळाने मात्र गंभीर रूप विविध जिल्ह्यांमध्ये धारण केले आहे.राज्यातील बहुतांशी तालुक्यांमधील गावांमध्ये भीषण दुष्काळाच्या दाहकतेने शेतकरी,जनावरे हैराण झाले आहेत,चाराछावण्या सुरू करून दुष्काळी कामे सुरू होणे गरजेचे आहे,जळून गेलेल्या फळबागांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळून त्यांना दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे.पण आचार संहिता असल्याने प्रशासन ठप्प आहे,लोकप्रतिनिधीही काही करू शकत नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे.त्यामुळे आचार संहिता शिथिल करून लोकप्रतिनिधींना शासकीय अधिकाऱ्यांसमवेत दुष्काळी आढावा बैठका घेण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून गावोगावी दुष्काळाची तीव्रता कमी होऊन बळीराजाला दिलासा मिळेल अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

Comment here