उस्मानाबाद

छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती मोर्चा जिल्हास्तरीय चिंतन बैठक संपन्न

 

उस्मानाबाद – प्रतिक भोसले

संविधान हे रयते साठी आहे जर रयते ची गरज असेल तर त्यात बदल होऊ शकतो
कायदा हा समाजाच्या हिताचा असावा, मराठा समाजाच्या मुलांचे भविष्य सुखकर व्हावे यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, शिक्षण आणि नोकरी साठी आपण हतबल होत आहोत, फक्त शेतकरी म्हणून का जगायचं आणि किती दिवस असच राहणार आहोत, मराठा लोकप्रतिनिधिंनी एकसंघ ताकद दिली तर नक्कीच मार्ग निघेल. सरकार झोपेतच असते त्यामुळे आरक्षण लढा हा त्यांना जागे करणाराच असला पाहिजे दबाव गट सक्षम असला पाहिजे तरच आरक्षण शक्य असल्याचे मत या वेळी आयोजकांनी व्यक्त केले.

तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चा जिल्हास्तरीय चिंतन बैठकित सहभागी होत बोलताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, न्यायालयाने काढलेल्या त्रुटीची पूर्तता अन राज्य मागास आयोगाकडून दुरुस्ती करत नूतन अहवाल सादर होणे आवश्यक आहे, तसेच राज्य मागास आयोग सदस्यांना आदेश द्यावेत नवीन दुरुस्ती करावी आणि केंद्र सरकारकडे विनंती मागणी करत घटना दुरुस्ती करून घ्यावी लागेल, यात पक्ष महत्वाचा नाही, मराठयांना हक्काचे आरक्षण मिळायला हवं यासाठी कायम आपल्या सोबत असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

या वेळी राज्य समन्वयक सज्जन साळुंके, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, महेश गवळी, जीवनराजे इंगळे, आबासाहेब कापसे, कुमार टोले, अजय साळुंके, प्रशांत अपराध, प्रतीक रोचकरी, अॅड. धिरज जाधव, गाढे इतिहास तज्ञ विशाल भोसले, सागर साळुंके, अण्णासाहेब क्षीरसागर, अॅड. धीरज पाटील, प्रशांत सोंजी, अॅड. मनीषाताई पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, अॅड. दत्तात्रय देवळकर, नगरराध्यक्ष सचिन रोचकरी, गजानन वडणे, बापूसाहेब कणे, गोविंद पारवे, सचिन पाटील, जय निंबाळकर, कैलास बागल, रोहित पडवळ, नंदकुमार गवारे, अॅड. विश्वजित शिंदे, अर्जुन साळुंके, इंद्रजित साळुंके, सुनील रोचकरी, शंतनू गंगणे, शिवाजी बोधले, अमर शेख, सतीश खोपडे, विपीन शिंदे, प्रा.नंदकुमार ननवरे, बाळासाहेब भोसले यांच्यासह जिल्हाभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी अनेक मराठा बांधवांनी आपले मत व्यक्त करत सरकारच्या आरक्षण विषयीच्या टोलवाटोलवीविरोधी प्रखरपणे निषेध व्यक्त केला, महाराष्ट्रात आज मराठयांना आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी चिंतन करण्याची गरज आहे.

राजकारण असो वा कायदा यावर संभ्रम बनवला जातो आहे, संविधानात ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही अस वाटत पण यातून मार्ग काढला पाहिजे. योग्य मार्गदर्शन अन ठोस कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, मराठा समाजाचा मतदानासाठी फक्त वापर केला जातोय राज्यात ५० पेक्षा जास्त मूक मोर्चे काढून देखील सरकारला समाजाच्या वेदना समजत नसतील तर नक्कीच आगामी काळात उद्रेक होईल असा सूर यावेळी या चिंतन बैठकीत निघाला.

विशेष म्हणजे मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री, आमदार, खासदार असताना मराठा आरक्षणा बाबत समाजावर अन्याय का झाला, कोणी केला याचा शोध उद्याच्या राज्यव्यापी बैठकीत घेतला जाणार असून त्याचे पडसाद पुन्हा राज्यभर पाहायला मिळतील असा इशारा आयोजक सज्जन साळुंके यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी मूक मोर्च्या ऐवजी ठोक मोर्चे निघतील असे चित्र दिसते. यामुळे आगामी काळात मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक होणार असल्याचं दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाची चिंतन बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध समन्वयक उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध ठराव घेण्यात आले. या ठरावाची अंमलबजावणी कशी करायची, याचा निर्णय उद्या राज्यस्तरीय मेळाव्यात घेण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले .