महाराष्ट्र

Rokhthok_Big_Breking_News “या” कामासाठी घेतला गैरफायदा.. नोकरीसाठी तिला नवर्‍यासह फार्महाऊसवर बोलावलं, पतीला बाहेर बांधून 6 नराधमांनी केला बलात्कार

वर्धा : – नोकरी देण्याच्या बहाण्याने एका विवाहितेला फार्महाऊसवर बोलावून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलसुरा शिवारात ही घटना घडली. सहा नराधमांनी महिलेच्या पतीला बांधून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून 22 वर्षीय विवाहित तरुणीला नोकरीचे आमिष देण्यात आलं होतं. याच कामानिमित्ताने आरोपींनी तिला सेलुसरा येथील शेतातील फार्म हाऊसवर बोलावण्यात आलं होतं. पीडित तरुणी ही शनिवारी (दि.27) आपल्या पतीसह फार्म हाऊसवर पोहोचली होती. या ठिकाणी सहाजण अगोदरच उपस्थित होते.
पीडितेच्या पतीला बाहेरच बसवण्यात आलं होतं आणि तिला आतमध्ये बोलावण्यात आले. पतीला यावर संशय आला असता आरोपींनी त्याला धमकी देऊन बाहेरच रोखले आणि दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर एक-एक करून सहा नराधमांनी तरुणीवर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपींनी पीडिता आणि तिच्या पतीला कुठेही काही वाच्चता केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पीडित तरुणीच्या पतीने देवळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकरण सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे पोलिसांनी त्याला सावंगी येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर पतीने सावंगी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तात्कळा पावलं उचलत फार्म हाऊसवर धाव घेऊन पंचनामा केला. तोपर्यंत घटनास्थळी पोलिसांचे एक पथक पोहचले. पोलिसांना फार्म हाऊसवरून आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Comment here