पुणे

भावी पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
गुरू म्हणजे शिक्षकांना परमेश्वराची उपमा दिली जाते, शिक्षक भावी पिढी घडविण्याचे अतुलनीय काम करतात, खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे आहेत असे गौरवोद्गार स्वाभिमानी महिला संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी प्रशांत सुरसे यांनी काढले.
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान 15 नंबर येथील गजानन मंदिरात करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी निराकार आध्यात्मिक मिशनचे राष्ट्रीय महासचिव अनिल मोरे, सुवर्णा सतीश जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा उपाध्यक्षा सविता अनिल मोरे, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी भोसले, सागर चव्हाण, बापू धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शिक्षक विठ्ठल लोखंडे, कुणाल ताजने, गुलचंद मुंडे, स्मिता सचिन तांबे, शर्मिला मारणे यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन गजानन मित्र मंडळ, स्वाभिमानी महिला संस्था, श्रीगणेश मित्र मंडळ, निराकार आध्यात्मिक मिशन यांनी केले होते.