पुणे

मोटारसायकल चोर केला जेरबंद १ लाख रुपये किमतीच्या ५ मोटारसायकली जप्त

 

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख पुणे पोलिस अधिक्षक यांनी जिल्ह्यातील पाहिजे असलेले फरार आरोपी शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते, सदरील आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ठ पथक बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय •बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून इसम नामे दत्तात्रय उर्फ बाप्पु भागवत माने वय ३० वर्षे रा शेळगाव, ता. इंदापूर, जि पुणे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची विना नंबर असलेली गाडी मिळून आली त्यास गाडीचे कागदपत्र बाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर इसम कडील गाडीचे इंजिन नंबर तसेच चासि नंबर याची माहिती घेतली असता सदरीलची गाडी ही अशपाक हसन सय्यद रा. शिंदे नगर, फलटण यांचे मालकीची असलेचे समजले त्यावरून अधिक माहिती घेतली असता सदर गाडी ही शेळगाव मशीद येथून चोरीस गेली असल्याचे समजले त्याबाबत वालचंद नगर पो स्टे गुर नं ४४५/२०२१ भा द वी कलम ३७९ नुसार दाखल असलेचे समजले.

सदरील आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कडून पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१) एक हिरो होंडा स्प्लेडर मोटार सायकल की रु:२०,००० २) एक हिरो होंडा स्प्लेडर मोटार सायकल कीं रु:२०,००० ३) एक हिरो होंडा शाईन मोटारसायकल की रु:२०,०० ४) एक हिरो होंडा पॅशन मोटारसायकल की रु : २०, ७ ५)४) एक हिरो होंडा पॅशन मोटारसायकल की रु:२०,००० ५) एक बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल की रु:२०,००० असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी नामे दत्तात्रय उर्फ बाप्पु भागवत माने वय ३० वर्षे रा शेळगाव ता इंदापूर जि पुणे यास मुद्देमाल सह वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी वालचंद नगर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

सदरील कारवाई ही मा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पो उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहा पो फो अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा अभिजित एकशिंगे, पो हवा विजय कांचन, पो हवा अजय घुले, पो ना स्वप्नील अहिवळे पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे