पुणे

कदमवाकवस्ती येथील इंदिरानगर येथे साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

कदमवाकवस्ती येथील इंदिरानगर येथे साहित्य सम्राट डॉ.अण्ण

*हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

कदमवाकवस्ती :लहुजी शक्ती सेनेच्यावतीने कदमवाकवस्ती येथील इंदिरानगर येथे साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरवात लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर परिसरातील नागरिकांसाठी लहुजी सेनेच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळजवळ १०० च्या आसपास नागरिकांनी सहभाग दर्शवीला.संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे समाज प्रबोधन गीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांस भगवा प्रतिष्ठान, संघर्ष युवा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी तरुण मंडळ, जय हिंद ग्रुप व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.